राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली , या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे , या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला , ‘मज्जाव’ शब्द आला
भीतीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने , या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्यं माझे , देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
– संत तुकडोजी महाराज
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF