या बाई या,
बघा बघा कशी माझी बसली बया … १
ऐकू न येते,
हळूहळू अशी माझी छबी बोलते … २
डोळे फिरविते,
टुलूटुलू कशी माझी सोनी बघते … ३
बघा बघा ते,
गुलूगुलू गालांतच कशी हसते … ४
मला वाटते,
हिला बाई सारे काही सारे कळते … ५
सदा खेळते,
कधी हट्ट धरून न मागे भलते … ६
शहाणी कशी,
साडी चोळी नवी ठेवी जशीच्या तशी … ७
– दत्तात्रय कोंडो घाटे
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF