Menu Close

उठा उठा चिऊताई – Utha Utha Chiutai Marathi Kavita

उठा उठा चिऊताई (Utha Utha Chiutai) ही कवी कुसुमाग्रजांची सुंदर अशी कविता आहे. यात सकाळी उशिरा पर्यंत झोपलेल्या चिमणीचे वर्णन त्यांनी केले आहे. शेवटी आपले बाळ उपाशी राहील म्हणून चिमणी लगेच कशी चारा पाणी शोधायला बाहेर पळाली ते पण यात वर्णिले आहे.

उठा उठा चिऊताई – Utha Utha Chiutai

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही?

लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे, चोहीकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?

बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर.

कुसुमाग्रज

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF

Watch it on YouTube: उठा उठा चिऊताई


Similar Post
कोलंबसचे गर्वगीत – कुसुमाग्रज