गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण; गंभीरपणे घडय़ाळ बोले – ‘आला क्षण-गेला क्षण’ घडय़ाळास या घाई नाही, विसावाही तो नाही पण; त्याचे म्हणणे…
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनि आरपार अमुचि दृष्टी…
एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके…