सिद्धमंगल स्तोत्र (Siddha Mangal Stotra) हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात,” श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी “सिद्धमंगल” स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल.
|| सिद्धमंगल स्तोत्र || Siddha Mangal Stotra ||
श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (१)
श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (२)
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (३)
सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (४)
सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (५)
दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (६)
पुण्यरुपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (७)
सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (८)
पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा |
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || (९)
|| श्रीपादराजमं शरणं प्रपद्ये ||
Watch it on YouTube: सिद्धमंगल स्तोत्र
Similar Post |
---|
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics |