Menu Close

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र (Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics) चा उपयोग साधक आपल्या आध्यात्मिक साधना आणि मानसिक शांतीसाठी करतात. भारतीय धार्मिक परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांच्या भक्ती पद्धतीमध्ये हा मंत्र वापरला जातो. आपण श्री स्वामी समर्थ तारक मंत्र च्या शोधात आहात का? तारक मंत्र इथे मिळेल. नक्की वाचा आणि दररोज म्हणा.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shri Swami Samarth Tarak Mantra

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

Watch on YouTube: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र


इस वेबसाइट पर चालीसा/आरती/स्तोत्र सिर्फ भक्ति को ध्यान में रखते हुए दिया गया है. इसके द्वारा हम किसी भी तरह से इस पर हक्क नहीं जता रहे. इसका असली हक इसके असली लेखक/कवी का ही रहेगा.


Simlar Posts
श्री स्वामी समर्थ आरती संग्रह – Shree Swami Samarth Aarti Sangrah
सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना – Sadguru Natha Haat Jodito Prarthana