Menu Close

श्री शंकराची आरती – Shri Shankarachi Aarti

आपण श्री शंकराची आरती (Shri Shankarachi Aarti) लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा (Lavthavti Vikrala) च्या शोधात आहेत का? आरती इथे वाचा. रोज सकाळी उठून, स्नान करून या आरतीचे पठण केल्याने घरात समृद्धी येते, मन शांत राहते.

श्री शंकराची आरती – Shri Shankarachi Aarti

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा,
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा,
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा,
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले,
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले,
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी,
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी,
रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥

– श्री शंकराची आरती

Watch it on YouTube: श्री शंकराची आरती


इस वेबसाइट पर चालीसा/आरती/स्तोत्र सिर्फ भक्ति को ध्यान में रखते हुए दिया गया है. इसके द्वारा हम किसी भी तरह से इस पर हक्क नहीं जता रहे. इसका असली हक इसके असली लेखक/कवी का ही रहेगा.


Related Post
श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा – Shri Shivlilamrut Adhyay 11 in Marathi