Menu Close

श्री हनुमान स्तुती – महारुद्र अवतार – Shri Hanuman Stuti Marathi Lyrics

श्री हनुमान स्तुती (Shri Hanuman Stuti) या कवनात श्रीराम भक्त हनुमान यांची स्तुती केली गेली आहे. जन्म झाल्यापासूनच हनुमान कसे महान होते, त्यांनी काय काय लीला केल्या याचे वर्णन या लिखाणात केले गेले आहे.

Shri Hanuman Stuti Marathi Lyrics

श्री हनुमान स्तुती – Shri Hanuman Stuti

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||१||

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे |
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ||
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||२||

गिळायासी जाता तया भास्करासी |
तिथे राहु तो येउनी त्याजपासी ||
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||३||

खरा ब्रह्मचारी मनाते विचारी |
म्हणोनी तया भेटला रावणारी ||
दयासागारू भक्तीने गौरविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||४||

सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा |
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा ||
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||५||

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी |
समस्तांपुढे तापसी निर्विकारी ||
नमू जावया लागी रे मोक्षपंथा |
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||

संकट कटै मिटै सब पीरा,
जो सुमिरै हनुमत बलबीरा।
दीनदयाल बिरिदु सम्भारी !
हरहु नाथ मम संकट भारी !!

राम सिया राम सिया राम जय जय राम!

राम सिया राम सिया राम जय जय राम!

Watch it on YouTube: श्री हनुमान स्तुती


Similar Post
मारुती स्तोत्र – Maruti Stotra Marathi
श्री हनुमान चालीसा – Hanuman Chalisa in Hindi Lyrics