Menu Close

सहानभूती – कुसुमाग्रज – Sahanubhuti Kusumagraj

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोपर्याशी गुणगुणत अन अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
हृदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रूप दैन्याचे उभे मुर्त काय?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परी लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओंजळीत
चालु लागे तो दिन बंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपल्या मदात.

कुसुमाग्रज

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF