रांजण गावाला (Ranjan Gavala) हे गणपतीचे गाणे गणेशोत्सवात प्रत्येक ठिकाणी गायले अथवा स्पीकर वर वाजवले जाते. गणेश उत्सव सुरु आहे आणि हे गाणे वाजत नाही तो पर्यंत अशी मजा येत नाही.
रांजण गावाला – Ranjan Gavala Marathi Lyrics
रांजण गावाला, गावाला महा गणपती नांदला..
रांजण गावाला, गावाला महा गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे देव केव्हाचा जागला…
रांजण गावाला, गावाला महा गणपती नांदला..
त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपेSsss शिवशंकराला टोपे
पुत्र गणपती गणपती रणी साहाय्याला धावला..
रांजण गावाला गावाला महा गणपती नांदला
त्रिपुराचा नाश केला गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला….. नं गण येथेचि राहिला
दहा शुंडांचा शुंडांचा -अहा ! वीसा भुजांचा शोभला..
रांजण गावाला गावाला महा गणपती नांदला
स्तोत्र संकट नाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे
स्तोत्र संकट नाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे
स्तोत्र संकट नाशनाचे….. तुम्ही बोला बोला वाचे
महा उत्कट उत्कट देव भक्तिला पावला
रांजण गावाला गावाला महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला महा गणपती नांदला
रांजण गावाला गावाला महा गणपती नांदला
Watch it on YouTube: रांजण गावाला, गावाला महा गणपती नांदला
Song Name | रांजण गावाला – Ranjan Gavala |
---|---|
Singer | Lata Mangeshkar & Usha Mangeshkar |
Music Director | Yeshwant Deo |
Lyrics By | Vasant Bapat |
Album | Ganapati Aarti By Lata Mangeshkar And Usha Mangeshkar |