Menu Close

पैठणी – शांता शेळके – Paithani Marathi Kavita

फडतालात एक गाठोडे आहे; त्याच्या तलाशी अगदी खाली
जीथे आहेत जुने कपडे , कुंच्या, टोपडी शेले शाली

त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारली पदर, जरी चोकडी, रंग तीचा सुंदर धानी.

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती

पैठनीच्या अवती भवती द्रब्लणारा सूक्ष्म वास,
ओलखीची.. अनोलखीची.. जाणीव गूढ़ आहे त्यास.

धुप.. कापूर.. उदबत्त्या जलत गेले कीती श्रावण
पैठनीने या जपले एक तन एक मन..

खस-हीन्यात माखली बोटे पैठनीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा स्त्राव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मउपणा ल्याला

पैठनीच्या घडीघडीतून अवघे आयुश्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, माझ्या आजीचे सोने झाले.

कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवलून
मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवलून

मधली वषे गलून पडतात , कालपटाचा जुलतो धागा
पैठनीच्या चोकदानो आजीला माझे कुशल सांगा…

शांता शेळके

 

माफीनामा: मूळ कवितेतल्या शब्दांना जश्यास तसे राखण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, पण काही ठिकाणी शब्द राखता आलेले नाहीत. जोडशब्द खूप कठीण आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो.

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF