T20 World Cup Semifinals: भारताने सुपर-12 मध्ये झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत गट-2 मध्ये अव्वल स्थान पटकावले. आता टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी कबूल केले आहे की, इंग्लंडविरुद्धच्या आगामी उपांत्य फेरीसाठी तो आपली प्लेइंग इलेव्हन बदलण्याचा विचार करणार आहे
झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या ऋषभ पंतच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचेही पुनरागमन होऊ शकते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, मला वाटतं की 15 मधील प्रत्येकाबद्दल आमचं मन पूर्णपणे मोकळं आहे. आमचा विश्वास आहे की जो कोणी 11 मध्ये असेल तो आम्हाला कमकुवत बनवणार नाही, आम्ही ज्या प्रकारची टीम निवडली आहे.
[Source: eSakal]