Pakistan Vs New Zealand Semi Final T20 World Cup 2022 :
टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पाकिस्तानने 3 विकेट्स गमावून शेवटच्या षटकात पार केले. कर्णधार बाबर आझमने 53 धावांची तर मोहम्मद रिझवानने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद हारिसने 30 धावा करत त्यांना चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवातीनंतर डाव सावरत 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक ठोकले. तर कर्णधार केन विलियम्सनने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.
47-0 (5 Over) : पाकिस्तानची आक्रमक सुरूवात
न्यूझीलंडचे विजयासाठीचे 153 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने 5 षटकात नाबाद 47 धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवानने पहिल्याच षटकात मिळालेल्या जीवनदानाचा चांगला फायदा उचलत आक्रमक फलंदाजी केली. सुरुवातीलाच हा रन रेट ९ पेक्षा जास्त होत्या. परिस्थिती अशी होती की फक्त १६ षटकात सामना जिंकला असता.
[Source: eSakal]