Jio PhonePe offer
हो तुम्ही बरोबर वाचलेत. रुपये ३९९ चा जियो चा रिचार्ज फोनपे द्वारे केल्यास १०० रुपया पर्यंत सूट मिळेल. त्यासाठी आपल्या माय-जियो अँप मध्ये जियो ने दिलेले ५० रुपयाचे कूपन असणे आवश्यक आहे आणि आपल्या फोनपे वॉल्लेट मध्ये पैसे असणे आवश्यक आहे.
कसा करायचा आहे रिचार्ज?
१) माय जियो अँप उघडा, आणि रिचार्ज पर्याय निवडून ज्या जियो क्रमांकाला रिचार्ज करायचा आहे तो निवडा.
२) रिचार्ज च्या यादीत आपल्याला रुपये ३९९ चा पर्याय दिसेल, तो निवडा.
३) तिथून पुढे गेल्यावर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी बरेच पर्याय दिसतील, त्यातून फोनपे निवडा, आणि Pay बटण दाबा.
४) एका पॉपअप विंडो मध्ये तुम्हाला तुमचा फोनपे क्रमांक टाकायचा आहे. त्या क्रमांकाला ओ टी पी पाठवला जाईल. आलेला ओ टी पी तुम्हाला तिथेच टाकून खात्री करावी लागेल.
५) पुन्हा एकदा रिचार्ज ची रक्कम आणि फोनपे वॉल्लेट मधल्या रक्कम दिसू लागतील. त्यांची खात्री करा.
६) पुढे Pay by PhonePe बटण वर क्लिक करा. आणि रिचार्ज झाल्याची खात्री करा.
७) रिचार्ज होण्या आधीच ५० रुपयाची सूट तुम्हाला मिळालेली असेल. म्हणजे तुमच्या फोनपे वॉल्लेट मधून फक्त ३४९ रुपये कापले जातील.
८) रिचार्ज झाल्यावर तुमच्या फोनपे वॉल्लेट मध्ये ५० रुपये लगेच क्रेडिट होतील.
अश्या प्रकारे रु. ३९९ चा रिचार्ज आपल्याला फक्त रु. २९९ मध्ये मिळेल.
अधिक माहिती साठी जियो च्या या पानावर आपण भेट देऊ शकता : Jio PhonePe offer
Image source : Jio official website