India vs Zimbabwe T20 World Cup : भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या प्रथम स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगलादेशला हरवून 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत आपले स्थान पुन्हा मिळवले. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव 115 धावात गुंडाळला.
भारताने सुपर 12 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरूद्ध आक्रमक सुरूवात केली. मात्र मधल्या षटकात भारताच्या पाठोपाठ तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिला. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावा करून भारताला 186 धावांपर्यंत पोहचवले.
सूर्यकुमारच्या 1000 धावा पूर्ण
सूर्यकुमार यादवने 2022 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला.