Menu Close

IND vs ENG T20WC22 : भारताचे आव्हान संपुष्टात; इंग्लंडचा 10 विकेट्स राखून विजय

Source: Zee News

India Vs England 2nd Semi Final T20 World Cup 2022 : इंग्लंडने भारताचा सेमी फायनलमध्ये तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत वर्ल्डकपमधून पॅक अप केले. भारताने 169 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता पार केले. जॉस बटलरने (Jos Buttler) 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. तर अलेक्स हेल्सने (Alex Hales) 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.

भारताची धावसंख्या मंदावली असताना भारताचा हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) धडाकेबाज खेळी करत भारताला 20 षटकात 6 बाद 168 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 32 चेंडूत 63 धावांची खेळी केली. याचबरोबर विराट कोहलीने (Virat Kohli) देखील अर्धशतकी खेळी करत हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने (Rohit Sharma) 27 तर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 14 धावांचे योगदान दिले.

IND vs ENG T20WC22 : भारताचे आव्हान संपुष्टात; इंग्लंडचा 10 विकेट्स राखून विजय

 

[Source: eSakal]