अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर माहिती. [Toll tax for Atal Setu]
कार/चारचाकी : देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून चारचाकी वाहनाला एका बाजूने प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल आकारला जाणार आहे. तर दोन्ही बाजूंनी वाहतुक (Atal Setu Toll) करण्यासाठी अवघे 375 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच सरकारने दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी पासची देखील व्यवस्था केली आहे. त्यामुळे नियमित पाससाठी 625 तर मासिक पाससाठी 12 हजार 500 रुपये असा टोल आकारण्यात येणार आहे.
मिनीबस : अटल सेतू पुलावरून मिनीबसने एकाबाजूने प्रवास करण्यासाठी 400 तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी 600 रुपये टोल आकारलाजाणार असल्याचे दिसत आहे. तसेच मिनीबसला महिन्याच्या पाससाठी 1 हजार तर मासिक पाससाठी 20 हजार रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.
छोटे ट्रक/वाहने : व्यापाऱ्यांसाठी लागणाऱ्या छोट्या वाहनांना एका बाजूने वाहतुकीसाठी 830 रुपये लागणार आहेत. तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी 1245 रुपये इतका टोल द्यावा लागेल. अशातच दैनंदिन पाससाठी 2075 तर महिन्याच्या पाससाठी 41 हजार 500 रुपये इतका दर द्यावा लागणार आहे.
एमएव्ही (3 एक्सेल) : एमएव्ही या प्रकारच्या वाहनांसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी 905 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी 1360 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. याशिवाय महिन्याच्या पाससाठी एकाबाजूने प्रवास करायचा असेल 2265 तर मासिक पाससाठी 45 हजार 250 रुपये इतका टोल द्यावा लागेल.
मोठे ट्रक/वाहने (4-6 एक्सेल) : मोठे ट्रक/वाहने अशा वाहनांना एका बाजूने 1300 रुपये टोल द्यावा लागेल. तर दोन्ही बाजूंने प्रवास करणार असाल तर 1950 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. याशिवाय दैनंदिन पाससाठी 3250 रुपये आणि मासिक पाससाठी 65 हजार रुपये टोल भरावा लागेल.
अवजड वाहने : या प्रकारच्या वाहनांसाठी सागरी पुलावर एका बाजूने 1850 रुपये टोल भरावा लागेल. तर दोन्ही बाजूंसाठी 2370 इतका टोल भरावा लागणार आहे. तसेच या वाहनांना दैनंदिन पाससाठी 3950 रुपये टोल भरावा लागणार आहे. याशिवाय मासिक पाससाठी अवजड वाहनांना 79 हजार रुपये टोल भरावा लागणार आहे.
Source: [SpreadItNow]