तुला फुकाट दिलंया सारं (Tula Fukaat Dilaya) हे आनंद शिंदे यांनी गायलेले आणि हर्षद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेले अतिशय सुंदर असे गाणे आहे. सध्या गाण्यासोबतच याच्या DJ versions वर सुद्धा तरुणाई खूप थिरकते.
तुला फुकाट दिलंया सारं – Tula Fukaat Dilaya Lyrics
जमीन जुमला भला तो बंगला, तुला केलया वारसदार,
होता भीमराव लई दिलदार, तुला फुकाट दिलंया सारं ||
गावकुसाच्या बाहेर होतं तुझं मोडक तोडकं घरं,
ज्याला सोईचं नव्हतं दार, वर कचाट्याचं छप्पर (2),
गळ्यात मडकं पाठीला झाडु, फिरायचा दरोदार,
होता भीमराव लई दिलदार, तुला फुकाट दिलंया सारं ||
नव्हतं जवळ बसत कोणी, नव्हतं मल्याच दीसत कोणी,
होता असून नसल्यावानी, नव्हतं तुला रं पुसत कोणी (2),
भले भले ते झुकतात आजं , केलं तुला मतदार,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकाट दिलंया सारं ||
आता हातात आला फोन आणि दारात आली गाड़ी,
गाववेशीच्या बाहेर हाय का , आता गावत बनली माड़ी (2),
गळ्यात सोनं हातात सोनं, (तुझ्या) बोटात अंगठ्या चार,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकाट दिलंया सारं ||
खातों भिमाची तूप अन रोटी , नावं भलत्याचं घेतोय ओठी,
धन बापाचं बसलाय दाबून, काय केलं तू समाजसाठी (2),
बंगला हा सारा सुनिल समाज, आता बसना गड़ी गप् गारं,
होता भीमराव लई दिलदार तुला फुकाट दिलंया सारं ||
जमीन जुमला भला तो बंगला, तुला केलया वारसदार,
होता भीमराव लई दिलदार, तुला फुकाट दिलंया सारं ||
Watch it on YouTube: तुला फुकाट दिलंया सारं
Watch it on YouTube: तुला फुकाट दिलंया सारं DJ Version
Song Name | तुला फुकाट दिलंया सारं – Tula Fukaat Dilaya Marathi Song |
---|---|
Album / Movie | एका घरात या रे (Eka Gharaat Ya Re) |
Singer | आनंद शिंदे (Anand Shinde) |
Music Director | हर्षद शिंदे (Harshad Shinde) |
Lyrics By | सुनील खरे (Sunil Khare) |
Music Label | T-Series |
Similar Post |
---|
आम्ही भीमाचे गोंधळी – Aamhi Bhimache Gondhali Marathi Song |