If you are looking for “Maval Jaga Zala Ra ” then here it is. This song belongs to film Subhedar released in 2023. This song sung by Devdutta Manisha Baji & Avadhoot Gandhi. Lyrics are written by Digpal Lanjekar.
Maval Jaga Zala Ra – Subhedar
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं सूर्य शिवबा उगवं जी..
मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली
सह्याद्रीला आज येतीया जाग
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं
हे सर्जा रं..
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी
आधार जेयांचा मानी बळीराजं
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी…
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी
काळाच्या ह्या.. भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही
जिजाईचा पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही
जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी
आशीर्वादे अंबाबाई
शिवरायांना यश देई
दुस्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झालं रं
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राजं..
मावळ जागं झालं रं
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी
गुलामी अंधार फिटं सूर्य सिवबा उगवं जी
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी
Song Name | Maval Jaga Zala Ra |
Album / Movie | Subhedar |
Star Cast | Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Ajay Purkar |
Singer | Devdutta Manisha Baji & Avadhoot Gandhi |
Music Director | Devdutta Manisha Baji |
Lyrics By | Digpal Lanjekar |
Music Label | Everest Entertainment |