Menu Close

मंगळागौर खेळू या – Mangalagaur Lyrics Baipan Bhari Deva

मंगळागौर (Mangalagaur Lyrics) हे गाणे बाईपण भारी देवा या फिल्म मधले आहे. बाईपण भारी देवा हा २०२३ मधील केदार शिंदे दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे. हे गाणे बाईपण भारी देवा या फिल्म मधले आहे. हे गाणे आदिती द्रविड यांनी लिहिले असून सावनी रवींद्र यांनी गेले आहे.

मंगळागौर खेळू या

जय देवी मंगळागौरी
जय देवी मंगळागौरी

ओवाळीन सोनिया ताटी
रत्नांचे दिवे
माळीकांच्या हाती
हीरेया मोती ज्योति
जय देवी मंगळागौरी
जय देवी मंगळागौरी

चल गं बाई खेळू या
मंगळागौर खेळू या
मंगळागौर खेळू या

गौराईचा खेळ बाई
आनंदात नाचू गाऊ
आनंदात खेळू या

मंगळागौर खेळू या
मंगळागौर खेळू या

हो हो, हो हो
हो हो, हो हो
हो हो, हो हो
हो हो, हो हो

पाणी लाटा गं, पाणी लाटा गं
पाणी लाटा, हो.. हो
सागर लाटा गं, सागर लाटा गं
सागर लाटा, हां.. हा

डोंगर माथ्यावर, डोंगर माथ्यावर
डोंगर माथा, हो.. हो
पाणी लाटा गं, पाणी लाटा गं
पाणी लाटा

दिंड्या मोड गं पोरी
दिंड्याची लांब दोरी

दिंड्याखाली कोण गं उभी
माय माऊली मी तर उभी
कोण्या गावाला गेली सांग दादा
कोण्या वाटेन गेली सांग दादा

दिंड्या मोड गं पोरी
दिंड्याची लांब दोरी

भोवर भेंडी भोवरा नाचे
भोवर भेंडी भोवरा नाचे
आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
तिचा सापडला चंद्रहार
तिचा सापडला चंद्रहार
हे..

सर सर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकीतो
सर सर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकीतो

या बाई झिम्मा नाचा या
आमच्या वेण्या घाला या

एल वेणी मोकळी
सोनियची साखळी
घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांचा डोलारा

डोलाऱ्याला खिडक्या
आम्ही दोघी बहिणी लाडक्या
लाड सांगू बापाला
पैसे मागू काकाला

गौर बसली नाहाया
शंकर आले पहाया
शंकर आमचे मेहुणे
दोन दिसांचे पाहुणे
हुशः

चल गं बाई खेळू या
मंगळागौर खेळू या
मंगळागौर खेळू या

गौराईचा खेळ बाई
आनंदात नाचू गाऊ
आनंदात खेळू या

मंगळागौर खेळू या गं
मंगळागौर खेळू या

हो हो हो हो
हो हो हो

Watch it on Youtube: मंगळागौर (Mangalagaur Lyrics)

Song Name मंगळागौर खेळू या – Mangalagaur
Album / Movie Baipan Bhari Deva
Star Cast Suchitra Bandekar, Shilpa Navalkar, Sukanya Mone, Deepa Chaudhari, Vandana Gupte & Rohini Hantangadi
Singer Savani Ravindra
Music Director Sai-Piyush
Lyrics By Aditi Dravid & Traditional
Music Label Sai-Piyush
Disclaimer: Lyrics displayed here are for educational purposes only. We respect the artists and don't promote copyright infringement instead, if you enjoy the music then please support the respective artists and buy the original music from the legal music providers such as Youtube, Gaana, Jiosaavn, iTunes etc. Songs owners may contact us on our Facebook Page Bruhaspatinath regarding any shared content issues, we'll definately respond within 48 hours.