Kashi Mi Jau Mathurechya Bajari: “कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी” हे रवी जाधव यांच्या नटरंग चित्रपटातले अप्रतिम गाणे आहे. हे गाणे बेला शेंडे आणि अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी – Kashi Mi Jau Mathurechya Bajari
दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी?
दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी?
बावरले मी, सावरले गं
जाऊ कशी चोरुन, बाई, मथुरेच्या बाजारी?
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
नटखट भारी, किसन मुरारी टपला यमुना तिरी
नटखट भारी, किसन मुरारी टपला यमुना तिरी
करतोया खोडी, घागर फोडी
जाऊ कशी चोरून, बाई, मथुरेच्या बाजारी?
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
हे, नकोस फोडु, कान्हा, माझी घागर आज रिकामी
हे, हसेल सारी गोकुळ नगरी, होईल रं बदनामी
हे, आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीचं घागर नशीबी माझ्या, शरण तुला मी आले
देवा, शरण तुला मी आले
वाट अडवूनी हसतो गाली गं
वेणु ऐकुन मोहित झाले
भान हरपूनी रमती गोपिका
श्याम रंगी न्हाऊन गेले
मन भुलवी असा, कान्हा झुलवी असा
हा नटनागर गिरीधारी
त्याच्या संग दंगले, रास रंगले
पिरतीची रीत न्यारी
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
Watch it on YouTube: कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी
Song Name | कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी |
---|---|
Album / Movie | Natarang – नटरंग |
Star Cast | Atul Kulkarni, Sonalee Kulkarni, Kishor Kadam |
Singer | Bela Shende, Ajay Gogavale |
Music Director | Ajay-Atul |
Lyrics By | Ajay-Atul, Guru Thakur |