Ganga Jamuna Donhi Khete: खान्देशात कापुस फार पिकतो. कल्पना केलीय की गंगा जमुना या पवित्र नद्यांच्या खोर्यात आलेल्या देवपह्य म्हणजे देवकपाशीच्या झाडापासुन विष्णु कृष्ण या देवांनी कापुस काढला जिचं राही रुक्मीणीने पोयतं केलं आणि ते सीतामाईने वधुसाठी आणलं. तर वर/ वधुचा बाप/ मामा/ भाऊ/ काका/ मावसा हे घोड्यावरुन ते घेण्यास गेले. आणि त्याला बाशिंग मोती जडलेले होते. बरोबर वाजा म्हणजे बॅन्डबाजा घेउन गेले आणि तिकडुन मोती पये (पोवळे) भरलेला रथ घेउन आले.
गंगा जमुना दोन्ही खेते – Ganga Jamuna Donhi Khete
गंगा जमुना दोन्ही खेते
गंगा जमुना दोन्ही खेते
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय सिताबाई खाते
तठे काय सिताबाई खाते
तठे काय कापुसना बेटे
तठे काय कापुसना बेटे
इस्नु किस्नु कांडया भरे
इस्नु किस्नु कांडया भरे
रायरुक म्हणे पोयतं करे
रायरुक म्हणे पोयतं करे
तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं (वधु/वराचे नाव) ले आणं
तठलं पोयतं (वधु/वराचे नाव) ले आणं
(वधु/वराच्या बाबांचे नाव)ना बाप घोडे उना
(वधु/वराच्या बाबांचे नाव)ना बाप घोडे उना
बाशिंग मोती जडे उना
बाशिंग मोती जडे उना
वाजा गहे रथ उना
वाजा गहे रथ उना
मोती पहे रथ उना
मोती पहे रथ उना
Watch it on YouTube: गंगा जमुना दोन्ही खेते
सदर गाणे खान्देशी लग्नात हळदीच्या दिवशी रात्री म्हटले जाते. तेलन पाडणे म्हणून एक प्रथा असते. तेलन पाडणे म्हणजे एका वाटीत थोडं गोडेतेल घेउन त्यात देवकपाशीची किंवा आंब्याच्या झाडाच्या काडीला कच्च सूत ५ वेळेस गुंडाळुन ती वाटीत उभी करतात. मग ५ सवाष्णी ती वाटी घरातल्या एकेक देवांवर धरुन खालील गाणे म्हणतात. सदर प्रथा सुरु असताना नवरदेव / नवरी पाटावर बसलेले असतात.
Similar Post |
---|
गुलाबी साड़ी – Gulabi Sadi Lyrics |
नऊवारी पाहिजे – Nauvari Sadi Pahije Lyrics |