“एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर” (Ek Chavdar Talyavar Lyrics) हे अतिशय सुंदर असे गाणे आहे. या गाण्यात कवी ने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी जे कार्य केले आहे, त्याची माहिती सांगितली आहे.
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर Ek Chavdar Talyavar Lyrics
दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर
रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला,
दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला.
असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहाद्दर.
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर
शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती,
त्याच भवानीपरी भीमाच्या हाती लेखणी होती.
निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर.
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर
शिवरायाने रयतेचा जो न्यायनिवाडा केला
तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला
प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर,
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर
दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर.
Watch it on YouTube: दोनच राजे इथे गाजले । आनंद शिंदे गायक । एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर । शिव भीम गीत | Bhim Song
Watch it on YouTube: Donach Raje Ithe Gajle || Bouncy Mix || Adesh Remix || Anand Shinde || Bhimjayanti Special 2k23
Song Name | एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर – Ek Tya Raygadavar Ek Chavdar Talyavar |
---|---|
Album / Movie | |
Singer | Anand Shinde |
Music Director | Utkarsh & Adarsh Shinde |
Lyrics By | Please provide information |
Music Label | Please provide information |