Apsara Aali: “अप्सरा आली” हे रवी जाधव यांच्या नटरंग चित्रपटातले अप्रतिम गाणे आहे. हे गाणे बेला शेंडे आणि अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
अप्सरा आली – Apsara Aali
कोमल काया की मोहमाया पुनवचांदणं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली
अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली
छबिदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटि तशी हनुवटी नयन तलवार
ही रति मदभरली दाजी ठिणगी शिणगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्याची
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली
अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली
Watch it on YouTube: अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
Song Name | अप्सरा आली – Apsara Aali |
---|---|
Album / Movie | Natarang – नटरंग |
Star Cast | Atul Kulkarni, Sonalee Kulkarni, Kishor Kadam |
Singer | Bela Shende, Ajay-Atul |
Music Director | Ajay-Atul |
Lyrics By | Ajay-Atul, Guru Thakur |