आम्ही भीमाचे गोंधळी (Aamhi Bhimache Gondhali) हे “भीमाचे गोंधळी” या अल्बम मधले मुख्य आणि उत्कृष्ट असे गाणे आहे. हे गाणे मिलिंद शिंदे यांनी गायले असून हर्षद शिंदे यांनी संगीतबद्ध केले आहे.
आम्ही भीमाचे गोंधळी – Aamhi Bhimache Gondhali
हजार वर्षापासून इथल्या (२), नीच नीतीचे बळी रे
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (२)
भीम, गौतम आणि फुले, कबीरांच्या भजनी डुले (२)
तिथेच शाहू महाराजांची (२) आम्ही ऐकली हळी रे
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (२)
जरी मरी आम्हाला छळी, मागी कोंबड्या बकऱ्याचे बळी (२)
तिची ती छाती झाली आमच्या बंदुकीची गोळी रे (२)
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (२)
गाळाच्या गाळातला नरवीर इथे जन्मला (२)
त्याच आधारी उभी ठाकली दीन दुबळ्यांची फळी रे
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (२)
या भारत भू च्या तळी आमच्याच मनाची कळी (२)
मला होऊन पाळेल इथे (२) आज भीमाचे घळी रे
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (२)
वामनचा वैरी मनु आज त्याचा खड्डा खणू (२)
वदने वामन नको तरी पण, गाडू भू च्या तळी रे
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (२)
हजार वर्षापासून इथल्या (२), नीच नीतीचे बळी रे
भिमाचे गोंधळी रे, आम्ही भिमाचे गोंधळी रे (२)
Chorus (६)
Watch it on Youtube: आम्ही भीमाचे गोंधळी
Song Name | आम्ही भीमाचे गोंधळी – Aamhi Bhimache Gondhali |
---|---|
Album / Movie | भीमाचे गोंधळी |
Singer | Milind Shinde |
Music Director | Harshad Shinde |
Lyrics By | Vaman Kardak |
Music Label | T-Series |
Similar Post |
---|
लाल दिव्याच्या गाडीला – Laal Divyachya Gadila Marathi Song Lyrics |
कायदा भीमाचा – Kaayda Bhimacha Marathi Song Lyrics |
तुला फुकाट दिलंया सारं – Tula Fukaat Dilaya Marathi Song Lyrics |