Menu Close

किती तरी दिवसांत Kiti Tari Diwsat

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसातं
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाऊन निर्भय
गावाकडच्या नदीत
होऊन मी जलमय.

आज अतंरात भीती
खुलय चांदण्याची थोडी
आणि नदीचा पवाह
अंगावर काटा काढी.

बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतया नळाची
शिरी धार मुखी ऋचा

बा. सी. मर्ढेकर

Kiti Tari Diwsat

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF