Menu Close

खोपा Khopa Marathi Poem

खोपा (Khopa Marathi Poem) ही बहिणाबाई चौधरी लिखित सुंदर अशी एक कविता आहे, ज्यात त्यांनी एका सुगरणीच्या खोप्याचे सुंदर असे वर्णन केले आहे.

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलांमधि जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याच्या कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा!

तिची उलूशीच चोच ,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं?

बहिणाबाई

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF