जर आपण खंडोबा तळी भंडार (Khandoba Tali Bhandar Lyrics) च्या शोधात आहेत तर ते इथे मिळेल. ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात, त्या प्रत्येक कुटुंबात ‘तळी भंडार’ हमखास होतोच. ‘तळी भंडार’ हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर ‘तळी भंडार’ करण्याची प्रथा आहे. काही कुटुंबांत विजयादशमी (दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो.
‘मणिसुर आणि मल्लासुर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषिमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच ‘तळी भंडार’ हे प्रतीक आहे’, असे प्रचलित आहे.
खंडोबा तळी भंडार
येळकोट येळकोट जयमल्हार ।
हर हर महादेव । चिंतामणी मोरया ।
आनंदीचा उदे उदे । भैरोबाचा चांगभले ।
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ।
येळकोट येळकोट जयमल्हार ॥ १ ॥
अगडधूम नगारा । सोन्याची जेजुरी ।
देव आले जेजुरा ।
निळा घोडा । पायात तोडा । कमरी करगोटा ।
बेंबी हिरा । मस्तकी तुरा ॥ २ ॥
अंगावर शाल । सदाही लाल ।
आरती करी । म्हाळसा सुंदरी ।
देवा ओवाळी नानापरी ॥ ३ ॥
खोबर्याचा कुटका । भंडाराचा भडका ।
अडकेल ते भडकेल । भडकेल तो भंडार ।
बोल बोल हजारी । वाघ्या मुरुळी ।
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम ॥ ४ ॥
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ।
येळकोट येळकोट जयमल्हार ।
Khandoba Tali Bhandar
Yelkot Yelkot Jay Malhar
Har Har Mahadev, Chintamani Morya
Anandicha Udo Udo, Bhairobacha Chang Bhale
Bol Ahankara Sadanandacha Yelkot
Yelkot Yelkot Jay Malhar
Agad Dhoom Nagara, Sonyachi Jejuri
Dev Aale Jejura
Nila Ghoda, Payat Toda, Kamari Kargota
Bembi Hira Mastaki Tura
Angavar Shal, Sadahi Laal
Aarati Kari, Mhalasa Sundari
Deva Ovali Nanapari
Khobryacha Kutka, Bhandaryacha Bhadka
Adkel Te Bhadkel, Bhadel To Bhandar
Bol Bol Hajari Vaghya Muruli
Khandoba Bhagat Pranam Pranam
Bol Ahankara Sadanandacha Yelkot
Yelkot Yelkot Jay Malhar
Watch it on YouTube: खंडोबा तळी भंडार (Khandoba Tali Bhandar Lyrics)
Similar Post |
---|
Khanderao Mandir Shirpur – खंडेराव मंदिर |