कणा (Kanaa) ही कुसुमाग्रजांची खूप गाजलेली कविता आहे. शाळा कॉलेजातले तरुण ही कविता म्हणताना ऐकताना एकदम भारावून जातात. ओळखलंत का सर मला (Olakhalat Ka Sir Mala) पासून कुणी सुरुवात केली तरी काहींच्या शरीरावर शहारे येतात.
कणा – ओळखलंत का सर मला – Olakhalat Ka Sir Mala
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे , पडकी भिंत बांधतो आहे
खिश्याकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
– कुसुमाग्रज
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF
Watch on Youtube: कणा – ओळखलंत का सर मला
Similar Post |
---|
कोलंबसचे गर्वगीत – कुसुमाग्रज |