भारतीय आणि आत्मनिर्भरता या खरंच २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय माणूस आपल्या सोयीप्रमाणे देशभक्त आणि स्व-हित बघतो. जेव्हा आपल्याला ती वस्तू हवी असते, तेव्हा आपण म्हणतो की माझ्या एकट्याच्या बहिष्कार करण्याने काय होणार आहे? जेव्हा दुसरा कोणी घेताना दिसतो तेव्हा आपण त्याला शहाणपण शिकवतो, देशद्रोही म्हणतो.
आजच माझ्या एका बारामतीच्या मित्राने त्याचा मोबाईल शॉपी मध्ये One Plus आणि Oppo फोन आलाय च्या जाहिराती फेसबुक वर टाकलेल्या मी पाहिल्या. छातीत असं चर्रर्र झाले. देशात जे चिनी बहिष्काराचे वातावरण सगळीकडे सुरुये, ते बघता मित्राने जे केले तो अगदी विरोधाभास. हा फक्त काही दिखावा सुरु नाहीये, काही मोठ्या कंपन्यांनी चिनी कंपन्यांसोबत च्या बऱ्याच व्यवहारांना स्थगित केलेय.
आजच्या घडीला भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जगाच्या बऱ्याच मागे आहे. आपण मान्य करू शकतो की इलेक्ट्रॉनिक्स च्या बाबतीत आपण स्वदेशी नाही अंगिकारू शकत. हळू हळू इलेक्ट्रॉनिक्स क्रांती होईल भारतात, पण तो पर्यंत शक्य तेवढे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स (फोन किंवा कॉम्पुटर सोडून) आपण वापरण्याचा घाट घातला पाहिजे. आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मागे आहोत म्हणजे आपण हतबल आहोत असे नाही. मसाले, कापड, स्टील, बांधकाम क्षेत्रात आपण बरेच पुढे आहोत.
एका रात्रीत आत्मनिर्भर तर बनता येणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कुठलीही गोष्ट एका रात्रीत शक्य नसते. थेंबे थेंबे, तळे साचे. आज आपण छोट्या छोट्या गोष्टी पासून सुरु केले तर हळू हळू परिस्थिती सुधारेल. वस्तूंच्या वापरापूर्वी आपण एकदा तरी विचार करून, आहे त्या वस्तूचा पर्याय शोधायला हवा. सध्या लोकांच्या मोबाईल मध्ये जे अँप्लिकेशन्स आहेत, त्यासाठी बरेच लोक पर्यायी अँप्लिकेशन सोशल मीडिया वर टाकत आहेत. तसेच आपण प्रत्येक छोट्या पासून छोट्या चिनी वस्तूसाठी पर्याय शोधू शकतो. सध्या जर स्वदेशी पर्याय उपलब्ध नसेल तर आपल्या मित्र राष्ट्रांचे पर्याय आपण वापरू शकतो. उदा. रशिया, इस्राएल वैगरे.
ज्यादिवशी आपल्याला आपला स्वदेशी पर्याय मिळेल त्यावेळी आपण स्वदेशी पर्याय वापरायला सुरुवात करावी. आज जर तुम्ही करत नसाल स्वदेशी चा प्रचार, तर कृपया जे करत आहेत, त्यांची खिल्ली करू नका. काही चांगले करू शकत नसाल तर कमीत कमी वाईट तरी करू नका. हळू हळू आपण एक दिवस आत्मनिर्भर बनू. आपल्या ड्रॅगन शत्रूला मात देऊ शकू. ड्रॅगन शत्रू आपल्या बरोबरीने बलवान आहे. युद्ध हे दोन्ही देशांसाठी नुकसानदायक असणार आहे. काळाच्या मागे लोटणारे ठरणार आहे. युद्ध न करता जर आपल्याला यावर मात करायची असेल तर हा एकमेव मार्ग आहे.
Lets Be The Indian – Facebook page