Menu Close

गे मायभू – सुरेश भट – Ge Maybhu Tuze Mi Fedin Pang Sare

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे  मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला!

मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी
माझी ललाटरेषा बनते प्रयागकाशी!

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!

सुरेश भट

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF