Menu Close

देणाऱ्याने देत जावे – Denaryane Det Jave

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरवा पिवळया माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेलया दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देण्याऱ्याचे हात घ्यावे.

विं. दा. करंदीकर

 

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF