ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांधरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरवा कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर
– कवींचे नाव माहित नाही
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF