Menu Close

थोर तुझे उपकार आई – भास्कर दामोदर पाळंदे – Thor Tuze Upkar Aai

थोर तुझे उपकार आई (Thor Tuze Upkar Aai), या कवितेतून आईच्या महानतेची कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे. ही कविता कविवर्य भास्कर दामोदर पाळंदे यांनी लिहली असून बालभारती च्या पुस्तकात या कवितेचा समावेश होता.

थोर तुझे उपकार आई – Thor Tuze Upkar Aai

थोर तुझे उपकार
आई ! थोर तुझे उपकार ll ध्रु० ll

वदत विनोदें हांसत सोडी
कोण दुधाची धार ll १ ll

नीज न आली तर गीत म्हणे
प्रेम जिचें अनिवार ll २ ll

येई दुखणे तेव्हां मजला
कोण करी उपचार ll ३ ll

कोण कड़ेवर घेउनि फिरवी
चित्ती लोभ अपार ll ४ ll

बाळक दुर्बळ होतों तेव्हां
रक्षण केले फार ll ५ ll

त्वांचि शिकविले वाढविले त्वां
आहे मजवर भार ll ६ ll

स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें
होंते वारंवार ll ७ ll

नित्य करावे साह्य तुला मीं
हा माझा अधिकार ll ८ ll

भास्कर दामोदर पाळंदे

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF

Watch it on YouTube: थोर तुझे उपकार आई


Similar Post
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या – कवी बी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – Swami Tinhi Jagacha Aaivina Bhikari

1 Comment

Comments are closed.