अरे संसार संसार (Are Sansar Sansar) ही बहिणाबाई लिखित कविता आहे. जीवनात प्रत्येकाला कोण कोणत्या अडचणींचा सामना करत जगावे लागते त्याचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे.
अरे, संसार संसार – Are Sansar Sansar
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तव्हां मिळते भाकर!
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हणू नही
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हणू नही
अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येडा, गयांतला हार, म्हणू नको रे लोढनं!
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड
अरे, संसार संसार, म्हणू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिकने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दु:खाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदु:खाचा बेपार!
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझया जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार!
– बहिणाबाई चौधरी
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF
Watch it on YouTube: अरे, संसार संसार
Similar Post |
---|
मन वढाय वढाय – Man Vadhay Vadhay |