Menu Close

फ़ुलराणी – बालकवी Fulrani Balkavi Marathi Kavita

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमाली वरती
फ़ुलराणी ही खेळत होती

गोड निळ्या वातावरणात
अव्याज मने होती डोलत
प्रणय चंचला त्य भृलीला
अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसूनी
झोके घ्यावे गावी गाणी
ह्यानं ठावे काय तियेला
साध्या भोळया फ़ुलराणीला?

* * *

पुरा विनोदी संध्यावात
डोल डोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला
चंबून म्हणे फ़ुलराणीला
“छानी माझै सोनुकली ती
कुणाकडे गं पाहत होती
तो रविकर का गोजिरवाणा
आवडला अमुच्या राणीना”
लाज लाजली ह्या वचनांनी
साधी भोळी ती फ़ुलराणी
***
आंदोली संध्यच्या बसूनी
झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल
नभी चमकती ते ग्रहगोल
जादू टोणा त्यांनी केला
चैन पडेन फुलराणीला
निजली शेते निजले रान
निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणी ही
आज कशी ताळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा
काय जाहले फुलराणीला
***
या कुंजातून त्या कुंजातून
इवल्या इवल्या दिवट्या लावून
मध्यरात्रीच्या निवांत समयी
खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर
निर्झर गातो त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान
स्वप्नसंगमी दंग होऊन
प्रणय चिंतनीविलीन वृत्ती
कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होऊनि
स्वप्ने पाही मग फुलराणी

***

कुणी कुणाल अवकाशात
प्रणयगायने होते गात
हळूच मागून आले कोण
कुणी कुणा दे चुंबनदान
प्रणय खेळ हे पाहुन चित्ती
विरहार्ता फुलराणी होती
तो व्योमीच्या प्रेमदेवता
वाऱ्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरून खाली
फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुनऊनी नयनी
त्या वदल्या ही अमुची राणी

***

स्वरभूमीचा जुळवीत हात
नाच नाचतो प्रभात वात
खेळून दमल्या त्या ग्रह माला
हळूच लागती लापावयाला
आकाशाची गंभीर शांती
मंद मंद ये अवनी वरती
विरु लागले संशय जाल
संपत ये विरहाचा काल
शुभ्र धक्ल्याचे वस्त्र लेऊनी
हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्नसंगमी रंगत होती
तरीही अजुनि फुलराणी ती

***
तेजोमय नव मंडप केला
लक्ख पांढरा दाही दिशांना
जिकडे तिकडे उधळीत होती
दिव्य वऱ्हाडी गगनी येती
ला सुवर्णी झगे घालुनी
हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबी फेटा
झगमगणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला
हा वांगनिश्चय करावयाला
हे थाटाचे लग्न कुणाचे

गाऊ लागले मंगल पाठ
सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारुत राणा
कोकीळ घे तानावर ताना
नाचू लागले भारद्वाज
वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रविकर
नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागते सावध सारे
सावध पक्षी सावध वारे
दवमय ह अंत:पट फिटल
भेटे रविकर फुलराणीला

वधू वरांना दिव्य रवानी
कुणी गायिली मंगल गाणी
त्यात कुणीसे गुफीत होते
परस्परांचे प्रेम अहा ते
आणिक तेथिल वनदेवीही
दिव्य आपुल्या उच्छवासांही
लिहीत होत्या वातावरणी
फुलराणीची गोड कहाणी
गुंगत गुंगत कवि त्या ठायी
स्फूर्ती सह विहराया जाई
त्याने तर अभिषेकच केला
नवगीतांनी फुलराणीला

बालकवी

Watch it on YouTube: फ़ुलराणी – बालकवी

Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF


Similar Post
कोठुनि येते मला कळेना Kothuni Yete Mala Kalena Marathi Poem
पारवा – बालकवी – Paarava Balkavi Marathi Kavita
घरटा – बालकवी Gharata Balkavi Marathi Kavita
निर्झरास – बालकवी – Nirzaras – Balkavi