जर तुम्ही एका तळ्यात होती बदके (Eka Talyat Hoti Badake) या मराठी कवितेच्या शोधात आहेत तर ती इथे मिळेल. ही कविता गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिली आहे.
एका तळयात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक॥
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक॥
पिल्लंस दु:ख भारी भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक॥
एकेदिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार तयाचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक॥
– ग. दि. माडगूळकर
Watch on Youtube: Click Here
Source – बालभारती आणि कुमारभारतीतल्या मराठी कविता PDF