Man Raanat Gela Ga: “मन रानात गेलं ग” हे राजीव पाटील यांच्या जोगवा चित्रपटातले अप्रतिम गाणे आहे. हे गाणे श्रेया घोषाल यांनी गायले असून अजय-अतुल यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
मन रानात गेलं ग – Man Raanat Gela Ga
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, बिल्लोरी खिल्लोरी सांज-सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
हे, लबाड या ताऱ्याला थांब-थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
हे, भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
हे, थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
हे, भानात, रानात हे धुंद धुंद झालं मन… रानात गेलं ग!
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, सर्राट ह्या आभाळी उंच-उंच जाऊ ग
वाऱ्याचं पंख होऊ ग
हे, थर्राट पाण्यामंदी चिंब-चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
हे, शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
हे, सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
हे, भानात, रानात हे धुंद-धुंद झालं मन
रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
ओ, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
Watch it on YouTube: मन रानात गेलं ग
Song Name | मन रानात गेलं ग – Man Raanat Gela Ga |
---|---|
Album / Movie | Jogwa – जोगवा |
Star Cast | Upendra Limaye, Mukta Barve, Kishor Kadam |
Singer | Shreya Ghoshal |
Music Director | Ajay-Atul |
Lyrics By | Sanjay Krishnaji Patil |