Menu Close

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु Jagat Vandya Avadhut Digambar

Bruhaspatinath - Lyrics

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना (Jagat Vandya Avadhut Digambar Tumhich Na) किंवा गुरुचरित्र सार. ज्या भक्तांना काही कारणांमुळे गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही त्यांनी रोज हा श्लोक वाचा आणि म्हणा. या श्लोकामध्ये संपूर्ण बावन्न अध्यायांचं उच्चारण केले आहे.

जगत वंद्य अवधूत दिगंबर – Jagat Vandya Avadhut Digambar

जगत वंद्य अवधूत दिगंबर,
दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ।
अनन्य भावे शरणागत मी,
भवभय वारण तुम्हीच ना ।

कार्तवीर्य यदु परशुरामही,
प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ।
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,
कृतार्थ केले तुम्हीच ना ।

नवनारायण सनाथ करुनी,
पंथ निर्मिला तुम्हीच ना ।
मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,
जन उध्दारा तुम्हीच ना ।

दासोपंता घरी रंगले,
परमानंदे तुम्हीच ना ।
नाथ सदनीचे चोपदार तरी,
श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना ।

युगायुगी निजभक्त रक्षणा,
अवतरतां गुरु तुम्हीच ना ।
बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती,
धारण करतां तुम्हीच ना ।।१।।

स्नान काशिपुरी चंदन पंढरी,
संध्या सागरी तुम्हीच ना ।
करुनी भिक्षा करविरी भोजन,
पांचाळेश्वरि तुम्हीच ना ।

तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,
निद्रा माहुरी तुम्हीच ना ।
करुनि समाधि मग्न निरंतर,
गिरनारी गुरु तुम्हीच ना ।

विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,
पीठापुरी गुरु तुम्हीच ना ।
श्रीपादवल्लभ नृसिंहसरस्वती,
करंजनगरी तुम्हीच ना ।

जन्मताच ॐकार जपोनी,
मौन धरियेले तुम्हीच ना ।
मौंजीबंधनी वेद वदोनि,
जननि सुखविली तुम्हीच ना ।।२।।

चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,
आश्रम घेउनि तुम्हीच ना ।
कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,
तीर्था गमले तुम्हीच ना ।

माधवारण्य कृतार्थ केला,
आश्रम देउनि तुम्हीच ना ।
पोटशुळाची व्यथा हरोनि,
विप्र सुखाविला तुम्हीच ना ।

वेल उपटुनी विप्रा दिधला,
हेमकुंभ गुरु तुम्हीच ना ।
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,
भक्तवत्सला तुम्हीच ना ।

विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,
निष्ठा देखुनि तुम्हीच ना ।
हीन जिव्हा वेदपाठी केला,
सजिव करुनी तुम्हीच ना ।।३।।

वाडी नरसिंह औदुंबरिही,
वास्तव्य करुनी तुम्हीच ना ।
भीमाअमरजा संगमी आले,
गाणगापूरी गुरू तुम्हीच ना ।

ब्रह्ममुहूर्ति संगमीस्थानी,
अनुष्ठानी रत तुम्हीच ना ।
भिक्षा ग्रामी करुनी राहता,
माध्याह्नी मठी तुम्हीच ना ।

ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,
उद्धरिले मठी तुम्हीच ना ।
वांझमहिषी दुभविले,
फुलविले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना ।

नंदीनमा कुष्ठी केला,
दिव्य देहि गुरु तुम्हीच ना ।
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,
कुमसि ग्रामी तुम्हीच ना ।।४।।

अगणित दिधले धान्य कापुनी,
शुद्रा शेत गुरु तुम्हीच ना ।
रत्नाईचे कुष्ठ दवडिले,
तीर्थे वर्णित तुम्हीच ना ।

आठही ग्रामी भिक्षा केली,
दीपवाळी दिनी तुम्हीच ना ।
भास्कर हस्ते चार सहस्त्रा,
भोजन दिधले तुम्हीच ना ।

निमिषमात्रे तंतुक नेला,
श्रीशैल्यासी तुम्हीच ना ।
सायंदेवा काशियात्रा,
दाखविली गुरु तुम्हीच ना ।

चांडाळा मुखी वेद वदविले,
गर्व हराया तुम्हीच ना ।
साठ वर्षी वांझेसी दिधले,
कन्या पुत्रही तुम्हीच ना ।।५।।

कृतार्थ केला मानस पूजनी,
नर केसरी गुरु तुम्हीच ना ।
माहुरचा सतिपति उठवोनी,
धर्म कथियला तुम्हीच ना ।

रजकाचा यवनराज बनवुनी,
उद्धरिला गुरु तुम्हीच ना ।
अनन्यभावे भजता सेवक,
तरतिल वदले तुम्हीच ना ।

कर्दळीवनीचा बहाणा करुनी,
गाणगापुरीस्थित तुम्हीच ना ।
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनी,
गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ।

विठाबाईचा दास मूढ़ परि,
अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,
दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।

जगत वंद्य अवधूत दिगंबर,
दत्तात्रय गुरु तुम्हीच ना ।
अनन्य भावे शरणागत मी,
भवभय वारण तुम्हीच ना,
भवभय वारण तुम्हीच ना ,
भवभय वारण तुम्हीच ना ।

।। श्री स्वामी समर्थ ।।

Download PDF: Jagat Vandya Avadhut Digambar PDF

Watch it on YouTube: जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना


Similar Post
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र – Shri Swami Samarth Tarak Mantra Lyrics