Menu Close

Happy Valentine’s Day 2024 – प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

२०२४ हे वर्ष नवीन आशा आणि आकांशा घेऊन आले आहे. नवीन वर्षात या प्रेमदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा (Happy Valentines Day 2024). जगभरात दरवर्षी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन वीक आता भारतातही साजरा केला जाऊ लागला आहे. व्हॅलेंटाईन डे ला मराठी भाषेत “प्रेम दिवस” म्हटले जाते. हा प्रेम दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर अन प्रेयसी आपल्या प्रेमाची कबुली करीत असतात.

Happy Valentine’s Day 2024

Valentines Day Photo from Freepik
Valentines Day Photo from Freepik

या आजच्या दिवसात प्रेमी युगुल आपल्या साठी एकांत शोधतील. कुठेतरी लांब निसर्गाच्या सानिध्यात म्हणा, बगिच्यातल्या कोपऱ्यात बसून प्रेमाच्या आणाभाका घेतील. एकमेकांच्या नजरेत डुंबून जातील, प्रेमाची अनुभूती घेतील.

Valentine’s Day Gifts

प्रेमदिवसाच्या या औचित्यावर आज सगळीकडे भेटवस्तू साठी जबरदस्त मागणी असते.जगभरातले प्रेमी एकमेकांसाठी भेटवस्तू घेत असतात. एकमेकांना देत असतात. काही लोक फक्त १४ फेब्रुवारी ला देतात तर काही लोक संपूर्ण आठवडा, म्हणजे ७ फेब्रुवारी पासून १४ पर्यंत रोज एक गिफ्ट देतात.

भेट वस्तूंचे मार्केट खूप मोठे आहे. पूर्वीच्या काळी सगळे लोक बाजारात जाऊन दुकानाच्या बाहेर गर्दी करत. आज सगळ्या प्रकारच्या भेटवस्तू या ऑनलाईन ऑर्डर करता येतात. ऑनलाईन भेटवस्तू साठी बरेच पर्याय उपलब्ध असल्याने आता ची तरुण पिढी ऑनलाईन चा पर्याय निवडतात. आपल्या प्रेमी / प्रेमिकेला काहीतरी वेगळे द्यायचे म्हणून सगळेच प्रेमी प्रयत्नशील असतात.

Happy Valentine’s Day 2024: History

व्हॅलेंटाईन डेची सुरुवात सेंट व्हॅलेंटाईनच्या कथेतून शोधली जाऊ शकते, ज्याला जोडप्यांना मदत करण्याच्या निस्वार्थ कृत्यांसाठी लक्षात ठेवले जाते. जोडप्यांचे विवाह गुपचूप पार पाडल्याबद्दल सेंट व्हॅलेंटाईनला सम्राट क्लॉडियस II याने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि शिरच्छेद केला असे म्हटले जाते. त्याच्या फाशीच्या दिवशी, सेंट व्हॅलेंटाईनने जेलरची अंध मुलगी ज्युलियाला एक चिठ्ठी पाठवली, ज्यामध्ये ‘युअर व्हॅलेंटाइन’ असा उल्लेख होता. तेव्हापासून, व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

Happy Valentine’s Day, my love

Valentine’s Day च्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या सुंदर चारोळ्या

प्रेम करण्यासाठी जोडीदारच का असावा,
कधी स्वत:वरही प्रेम करून बघ
प्रेमासाठी जीव द्यायची हिम्मत दाखवणारे अनेक आहेत
पण तु कधी स्वत:साठी जगून बघ..
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रत्येकाला मिळत नाही खरे प्रेम
डाव जरी चुकला तरी येथे होतो अनेकांचा गेम
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे तू आणि तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व
Happy Valentine Day

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तू नक्कीच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…….
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

चारोळी Source