हिट-अँड-रन प्रकरणांसाठी नव्याने सुरू झालेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कठोर तुरुंगवास आणि दंड नियमांच्या निषेधार्थ ट्रक, बस आणि टँकर चालकांनी तीन दिवसीय संप सुरू केला होता. महाराष्ट्रात, राज्य सरकारने पोलिसांना पेट्रोल आणि डिझेलचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात सुरू असलेल्या संपामुळे मंगळवारी प्रवाशांना प्रवासाची गैरसोय झाली. (strike by truck bus drivers).
ट्रक, बस आणि टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला
दरम्यान संप असल्याकारणाने पेट्रोल पम्पावर अश्यक्य अशी गर्दी झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन ओळीने आपला नंबर येण्याची वाट बघत आहेत. वाहनांची रांग लागल्यामुळे वाहन कोंडी सुद्धा होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस, कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांची कोंडी झाल्यामुळे त्यांना आपापल्या ठिकाणी जायला कमालीचा उशीर होतोय.
सध्या उच्च शिक्षणाचे कोर्सेस जसे की अभियांत्रिकी आणि वैद्यकीय च्या परीक्षा सुरु आहेत. अश्यात या संपामुळे त्यांच्या परीक्षांवर परिणाम होतो की काय अशी धास्ती आहे. हा संप सुरु असेल तो पर्यंत दूध, भाजीपाला, गॅस अश्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. संपामुळे भाजीपाल्याचे दरही वाढताना दिसून आले.
Three-day strike was launched by truck, bus and tanker drivers
The three-day strike was launched by truck, bus and tanker drivers to protest against tough jail terms and fines under the newly introduced Bharatiya Nyay Sanhita (BNS) for hit-and-run cases. In Maharashtra, the state government has requested the police to ensure uninterrupted supply of petrol and diesel. Meanwhile, the ongoing strike in Madhya Pradesh caused inconvenience to commuters on Tuesday.
Due to the strike, there has been an unnecessary rush at the petrol pump. Two-wheelers and four-wheelers are waiting in queue for their turn. Traffic congestion is also happening due to the queue of vehicles. Due to traffic jams, the buses of school students and vehicles of office workers, they are extremely late in going to their respective places.
Currently, examinations for higher education courses such as engineering and medical are underway. There is fear that this strike will affect their exams. Until this strike continues, there is a possibility of shortage of daily necessities like milk, vegetables, gas. Due to the strike, the prices of vegetables also increased.
Read Other Interesting Topics |
---|
boAt ने लॉंच केली कॉलिंग फिचर असेलेली स्मार्टवॉच; जाणून घ्या फीचर्स |
ICICI Bank’s new cash deposit system is very interesting |